Surprise Me!

कोविड मृतांना सन्मान देणे प्रत्येकाचे कर्तव्य : अमरनाथ पणजीकर | Corona | Coronavirus | Goa News

2021-06-16 6 Dailymotion

पणजी: कोविड महामारीच्या संकटाने आज संपुर्ण जगात हाहाकार केला आहे. शेकडो लोकांचे प्राण जात आहेत. कोविडच्या संसर्गाने मृत झालेल्यांना सन्मान देणे व त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच आडकाठी आणु नये अशी कळकळीची विनंती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.<br /><br />काल बस्तोडा येथे घडलेला प्रकार गोव्यात परत घडू नये यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलावित अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली असुन, गोमंतकीयांनी कसल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या गांवच्या कोविड बाधीत मृतांवर अंतिम संस्कार करण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Buy Now on CodeCanyon